औरंगाबाद – राज्यातील मुदत संपणाऱ्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया थांबवली आहे. निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार आज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीत निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहाची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली. त्यापूर्वी निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत प्रचंड अनागोंदी झाली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. अनेकदा यावर सुनावणी झाली. मात्र, निर्णय झाला नाही.
दरम्यान राज्यात निवडणुकीच्या कायद्यात बदल झाला. त्यामुळे याचिका निकाली काढावी अशी विनंती आयोगाने न्यायालयात केली. याचिकाकर्त्यांनी ही त्यावर आक्षेप नोंदवला नाही. आज सरन्यायाधीश यांच्यासमोर 16 व्या क्रमांकावर औरंगाबाद महापालिकेची याचिका सुनावणीस येणार आहे.