कराड | विंग (ता. कराड) येथील गायरान जागेत अतिक्रमण काढणेचे नोटीस ग्रामपंचायतीने संबधिताना बजावले होते. ते स्वीकारले नाही. उलट ग्रामपंचायत विरोधात न्यायालयात धाव घेत दिशाभूल करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. दाव्यातील अरोपही चुकीचे आहेत. ग्रामपंचायतीची नाहक बदनामी केली आहे. त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. असी महिती येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच शुभांगी खबाले यांनी दिली.
येथील गायरान जागेत अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. गायरान जमिनीवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केली आहेत. शेड उभारली आहेत. ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. तेव्हा ग्रामपंचायतीने त्यांना अनाधिकृत अतिक्रमण काढणेचे नोटीस महिन्यापुर्वी बजावले होते. मात्र, अतिक्रमण करणाऱ्यांनी ती नोटीस स्वीकारली नाहीत, म्हणून पोष्टाने पाठवली. गणेश मोरे, बाबासो माने, शिवाजी डाळे अशी नावे असून त्यांनी वादप्रश्न निश्चित न करता ग्रामपंचायतीला न्यायालयीन समंन्स पाठविले आहे. कमकुवत दुव्याचा आधार घेऊन दावा दाखल केला आहे. जागा बळकावण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. दाव्यातील आरोपही खोटे आणि चुकीचे असल्याचे म्हणणे यावेळी सदस्यानी मांडले. ग्रामपंचायतीची त्यामुळे बदनामी झाली आहे. मानसिकदृष्ट्या नाहक त्रास दिला जात आहे. त्याप्रश्नी आम्ही सदस्य कार्यकारणीची बैठक घेतली आहे. स्थळपाहणी केली आहे. महसूल विभागातर्फे अतिक्रमणीत जागेचा पंचनामा केला आहे. वरिष्ठ तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यात कारवाईची मागणी केली आहे. न्यायालयाची 4 आक्टोबर तारीख आहे. न्याय आमच्या बाजूने होईलच. मात्र, आम्हाला वारंवार त्रास दिला जात आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे सरपंच शुभांगी खबाले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
गट नंबर 1174 चा साधारण गायरन 10 हेक्टर क्षेत्र आहे. 15 ऑगस्ट दरम्यान प्रथमदर्शनी पाहणीत अतिक्रमने दिसून आली आहेत. अतिक्रमणे काढण्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. संबधिताना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. भविष्यात अतिक्रमणे अणखी वाढण्याचा धोका आहे. प्रशासनाकडे कारवाईची मागणी आहे, असे म्हणणे यावेळी ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी मांडले.