सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ख्रिसमस निमित्ताने रेल्वे (trains) प्रशासनाने मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सोलापूर-अजमेर गाडी क्रमांक 09628 ही साप्ताहिक हिवाळी विशेष एक्सप्रेस 29 डिसेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 12.50 वाजता सोलापूर येथून सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.05 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 09627 विशेष एक्स्प्रेस 28 डिसेंबर 2022 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत अजमेर येथून दर बुधवारी सकाळी 9 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
या दोन्ही एक्स्प्रेस (trains) कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम, नागदा जंक्शन, कोटा, सवाई माधोपूर जंक्शन आणि जयपूर जंक्शन या ठिकाणी थांबणार आहेत. सोलापूर येथील प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे (trains) प्रशासनाने ही विशेष एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे.
अजमेर-सोलापूर आणि सोलापूर-अजमेर या दोन्ही ट्रेन (trains) साप्ताहिक असल्याने 26 जानेवारीपर्यंत महिनाभरात त्यांच्या अपडाऊन अशा प्रकारच्या पाच ट्रिप होतील.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन सोलापूर विभागातून करण्यात आले आहे.
रिझर्वेशन कसे बुक कराल?
विशेष गाडी (trains) क्रमांक 09627/09628 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिwww.irctc.co.inया संकेतस्थळावर सुरू आहे. तिकीट काढण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्या. किंवा NTES ॲप द्वारे तुम्ही आपले तिकीट काढू शकता.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या