Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Wipro : गुंतवणुकीच्या अनेक पर्यांयांपैकी शेअर मार्केट हा लोकप्रिय पर्याय आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणारे नेहमीच मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधात असतात. अनेक नवीन गुंतवणूकदारांकडूनही सारखा हा प्रश्न विचारला जातो की, आत असे कोणते स्टॉक आहेत जे नवीन मल्टीबॅगर बनणार आहेत.

Wipro Ltd Up to 2.7% for Third Straight Session - Equitypandit

याबाबत तज्ञ सांगतात की,” पहिल्यांदा मल्टीबॅगर स्टॉक्सबाबत माहिती घ्या आणि त्यातून काय शिकता येईल ते पहा. यातून काही शिकले नाही तर मल्टीबॅगरही गमावून बसाल. मग ते टायटन असो, इन्फोसिस असो कि विप्रो असो… या सर्व मल्टीबॅगर्सची महत्वाची बाब म्हणजे चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून धीर धरणे. Wipro

Bonus Issue of Shares - Javatpoint

विप्रोचे बोनस शेअर्स

आज आपण आज भारतीय IT प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या Wipro बाबत चर्चा करणार आहोत. हे लक्षात घ्या कि, या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना शंभरपट रिटर्न दिला आहे. विप्रो ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी बोनस शेअर्स जारी करून आपल्या भागधारकांना मोठा लाभ दिला आहे. 2004 पासून विप्रोने गुंतवणूकदारांना पाच वेळा बोनस जाहीर केला आहे. गेल्या 20 वर्षांत या शेअर्सने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीला सुमारे 2 कोटी रुपयांमध्ये बदलेले आहे. यावरूनच या बोनस शेअर्सची ताकद आणि कंपनीच्या रिटर्नचा अंदाज लावता येऊ शकेल.

Bonus Issue of Shares - Vskills Blog

किती बोनस मिळाला ???

गेल्या 20 वर्षांपासून या IT कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. Wipro ने याआधी तीन वर्षांपूर्वी मार्च 2019 मध्ये 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. याचा अर्थ 3 शेअर्स असनाऱ्याना विप्रोचा एक शेअर बोनस म्हणून मिळेल. जून 2004 मध्ये विप्रोने 2:1, ऑगस्ट 2005 मध्ये 1:1, जून 2010 मध्ये 2:3 आणि जून 2017 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

किती कमाई केली ???

30 एप्रिल 2004 रोजी Wipro चे शेअर्स 57.92 रुपयांवर होते. जर यावेळी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर 1726 शेअर्स मिळाले असते. तसेच जर गुंतवणूक तशीच ठेवली असती तर 5 वेळा बोनस शेअर्स मिळाल्यानंतर सध्या एकूण 46026 शेअर्स झाले असते.

BSE वर 2 सप्टेंबर 2022 रोजी Wipro चे शेअर्स 407.80 रुपयांवर होते. यावेळी शेअर्सची किंमत 1.87 कोटी रुपये होती. सध्या विप्रोच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी हे शेअर्स 500 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानुसार आपला रिटर्न 2 कोटींहून जास्त झाला असता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.wipro.com/

हे पण वाचा : 

आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या

Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

PIB FactCheck: पीएम कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत सरकार देणार 5,000 रुपये, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर