हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून भक्तजन तसेच पंडित, विद्वान, कलाकार नेते, व्यवसायिक आयोध्यात उपस्थित राहणार आहेत. राम भक्तांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता, यावे यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
एका बाजूला राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची आणि प्राणप्रतिष्ठेची एवढी जल्लत तयारी सुरू असताना दुसरीकडे राम भक्तांना फसवण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. सध्या सोशल मीडियावर राम मंदिर स्कॅम याची सर्वात जास्त चर्चा होत आहे. कारण काही स्कॅमर्स राम मंदिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे लोकांचे मोठे नुकसान देखील होत आहे.
https://www.instagram.com/reel/C2CT1T1seON/?igsh=bXY0ZG56NDZsOGNp
व्हाट्सअपवर व्हायरल मेसेज
काही स्कॅमर्सची टोळी व्हाट्सअप, मेसेंजरवर एक मेसेज पाठवत आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला राम मंदिराच्या VIP दर्शनासाठी निवडण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला फक्त एका लिंकवर क्लिक करून फॉर्म भरण्याची गरज आहे. परंतु सध्या परिस्थितीत असा कोणताही फॉर्म राम मंदिराचा ट्रस्टकडून भरून घेण्यात येत नाहीये. तुम्ही जर या फसवणुकीला बळी पडत हा फॉर्म भरला तर तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस शिरेल. हा व्हायरस तुमचा फोन हॅक करेल आणि तुमचे OTP , Password मिळवून घेईल. ज्यामुळे तुमची लाखोंची फसवणूक होऊ शकते. तसेच फोन मधील महत्त्वाची माहिती समोरील व्यक्तीस मिळू शकते. अशा फसवणुकीला बळी पडायचे नसेल तर कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.