नवी दिल्ली । जर आपले ही अॅक्सिस बँक खाते असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. आता आपल्याला खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेतून पैसे काढण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर सेव्हिंग अकाउंट, सॅलरी अकाउंटसह इतर सुविधांच्या शुल्कामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. अॅक्सिस बँकेने 1 मे 2021 पासून आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटधारकांसाठी विविध सेवा शुल्कामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये एटीएममधून पैसे काढणे, एसएमएस अलर्ट आणि सेव्हिंग अकाउंट पासून ते सॅलरी अकाउंटपर्यंत पैसे जमा करणे समाविष्ट आहे. बँकेने विविध प्रकारच्या खात्यांसाठी किमान शिल्लक देखील वाढविली आहे. हे दर 1 मे 2021 पासून लागू होतील. चला तर मग त्यांबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात-
कॅश विथड्रॉवल चार्जेस
आता अॅक्सिस बँकेतून पैसे काढणे देखील महाग होईल. अॅक्सिस बँक दरमहा 4 एटीएम ट्रान्सझॅक्शन किंवा 2 लाख रुपयांचे ट्रान्सझॅक्शन फ्री देते. यानंतर, अतिरिक्त ट्रान्सझॅक्शनवर चार्जेस द्यावे लागतील. प्रति 1000 रुपयांवर 5 रुपये कट जाते. आता 1 मेपासून आता ग्राहकांना 1000 रुपयांची कॅश काढण्यासाठी 10 रुपये द्यावे लागतील.
SMS अलर्ट चार्जेस
बँकेच्या वेबसाइटनुसार आता बँक प्रति SMS साठी 25 पैसे आकारेल. सध्या दरमहा 5 रुपये आकारले जातात. यात बँकेने पाठविलेला OTP आणि प्रमोशनल SMS यांचा समावेश असणार नाही. हे नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होईल. हे चार्जेस प्रीमियम अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि बेसिक अकाउंटसाठी वेगवेगळे आहेत हे लक्षात असू द्यात.
किमान सरासरी शिल्लक नियम देखील बदलला
अॅक्सिस बँकेने 1 मे 2021 पासून किमान सरासरी शिल्लक मर्यादा वाढविली आहे. मेट्रो शहरांमध्ये अॅक्सिस बँकेच्या सुलभ बचत योजना असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम 10,000 रुपयांवरून 15,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. हे सर्व देशांतर्गत आणि एनआरआय ग्राहकांना लागू असेल.
सॅलरी अकाउंटच्या नियमात बदल
अॅक्सिस बँकेने सॅलरी अकाउंटचे नियमही बदलले आहेत. जर आपले सॅलरी अकाउंट 6 महिन्यांपेक्षा जास्त जुने असेल आणि कोणत्याही एका महिन्यात क्रेडिट नसेल तर दरमहा 100 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याच वेळी, जर आपल्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत ट्रान्सझॅक्शन होत नसेल तर 18 व्या महिन्यात 100 रुपये शुल्क आकारले जाईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा