न विचारता माहेरी का गेलीस म्हणत सासूची सुनेला जबर मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शुल्लक कारणावरून सासु बाईने सुनेची डोकं फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या परिसरामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी सुनबाईची तब्येत खराब असल्यामुळे तिने आंबेडकर नगर येथे आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु सासूबाईला न विचारता गेल्यामुळे त्यांच्या मनात सुनबाई बद्दल राग होता. दरम्यान रविवारी फिर्यादी महिला परत आपल्या सासरी आली. यावेळी सासूने ‘मला न विचारता तू माहेरी का गेलीस?’ या कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. यानंतर वाद वाढला, यादरम्यान सासूबाईने सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे सुनबाईचं डोकं फुटले आहे.

याप्रकरणी सुनबाईने सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.

Leave a Comment