फर्निचरच्या दोन दुकानाला भीषण आग; आगीत कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान

Satara Fire News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा तालुक्यातील वर्ये गावातील दोन्ही प्लायवूडच्या दुकानाला अचानक भीषण आग लागतयाची घटना घडली असून या आगीत शामुलचंद ओसवाल व रूपाशेठ या व्यावसायिकाच्या मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुकानातील फ्लायवूड व केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले असून परिसरात सर्वत्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरातील बघ्यांनी गर्दी केली आहे.

वर्ये हद्दीतील रामनगर कालव्यानजीक असलेल्या या फ्लायवूडच्या दुकानाला आज मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानातील कामगारांच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करीत संबंधित मालकास दूरध्वनीवरील कळविले. मात्र दुकानातील मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लायवुडच्या विशेषतः केमिकलमुळे आगीने भीषण स्वरूप धारण केले होते.काही क्षणातच आगीच्या माहाकाय ज्वालांनी वेढले.

या भीषण आगीने शेजारील रूपचंद सोळंकी यांचे घरे व रूपाशेठ यांच्या दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे.या आगीने शेजारील कुटुंबातील लोक हादरून गेले असून महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.आग विझवण्यासाठी सातारा व भुईंज साखर कारखान्याचा अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले असून दोन्ही बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दुकानदार हादरून गेले आहेत.आगीचे कारण अद्यापही समजू शकलेली नाही.