बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम; वेदनादायी पद्धतीने झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मेहुणी आणि दाजी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी विष घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात दाखल करुनसुद्धा त्यांचा जीव वाचू शकला नाही. यातील युवकाचं वय सुमारे 26 वर्ष तर तरुणीचं वय 22 वर्ष होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती जवळच्याच पीलीभीत जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, त्याच्यासोबत आढळलेली महिला ही त्याच्या पत्नीची लहान बहीण म्हणजेच त्याची मेहुणी होती. अधिक चौकशी केली असता युवकाचे आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं, मात्र कुटुंबीयाचा या नात्याला विरोध होता.

कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधामुळे मेहुणीनं आपल्या दाजीसोबत घरातून पळ काढला आणि नंतर दोघांनीही विष प्राशन केलं. भोजीपुराच्या सेंथल रोड येथे एक दाम्पत्य बेशुद्धावस्थेत पडलेलं आहे असा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या ठिकाणी त्यांचा मुत्यू झाला. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती अ‍ॅडिशनल एसपी राजकुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

Leave a Comment