जितेंद्र आव्हाडांच्या शासकीय बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न (woman attempts suicide) केला. पण, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड बंगला आहे. रात्री एक महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली आणि तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून आत्मदहनाचा (woman attempts suicide)प्रयत्न केला. तृप्ती निवृत्ती कांबळे असे या महिलेचे नाव आहे. बंगल्यासमोर असलेल्या फुटपाथवर या महिलेनं पेटवून घेण्याचा प्रयत्न (woman attempts suicide) केला, हा प्रकार तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी धावत जाऊन महिलेल्या हातातून पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली आणि त्या महिलेला ताब्यात घेतले.

जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर शिवसेना नाराज
दरम्यान, वरळी येथील बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना 50 लाख रूपयांना घरे दिली जातील. 2250 पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बीडीडी चाळीत पोलिसांना 500 चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च 1 कोटी 5 लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेकडून नाराजी
जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. घरांची किंमत 50 लाख जास्त असल्याबद्दल बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंब आणि शिवसेनं नाराजी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा आहे. त्यामुळे या निर्णयामुळे आदित्य ठाकरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment