नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सावत्र आईनं मुलांसोबत अमानुष कृत्य केल्याची अनेक प्रकरण आपण आजवर ऐकली असतील. मात्र आता अशी एक घटना समोर आली कि ज्यामध्ये वडिलांच्या गर्लफ्रेंडनं अल्पवयीन मुलाचा छळ केला आहे. हि घटना तमिळनाडूच्या वेल्लोर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आठ वर्षाच्या मुलासोबत अमानुष कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या हात-पाय, पाठ आणि प्रायव्हेट पार्टवर चटके दिल्याचे निशाण आढळुन आले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, 35 वर्षाच्या सेत्तूचं लग्न ईश्वरी नावाच्या महिलेसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. एकाचं वय 10 वर्ष तर दुसऱ्याच 8 वर्ष आहे. चार महिन्यांआधीच सेत्तूची पत्नी ईश्वरीनं आत्महत्या केली होती. यानंतर सेत्तू शेजारीच राहणाऱ्या वेनी नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहू लागला होता. कधी कधी वेनी सेत्तूच्या मुलांना मारहाणसुद्धा करत असे.
यानंतर सेत्तूचा आठ वर्षांचा मुलगा मंगळवारी तिथून पळ काढत आपल्या मावशीच्या घरी पोहोचला. मुलाला अचानक घरी पाहून त्याची मावशी विचारात पडली. मात्र, जेव्हा मुलाच्या पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टजवळ जळाल्याचे निशाण पाहिले तेव्हा ती हादरली आणि ती मुलांना घेऊन गुडियाथम पोलीस ठाण्यात पोहोचली आणि घडलेल्या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.