संतापजनक ! सहा वर्षांपासून मुल नाही म्हणून सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

0
53
Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये लग्नानंतर सहा वर्षे झाली तरी मुल होत नसल्याने महिलेला तिच्या दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकाराला तिने नकार दिल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसवल्याचा प्रकार घडला आहे. कुटुंबियांच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिला पोलीस अधीक्षकांकडे गेली आणि घडलेली सगळी आपबिती सांगितली.

या महिलेचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतू मूल न झाल्याने सासरचे लोक तिला त्रास देत होते. तसेच तिच्यावर दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. जेव्हा पीडितेने यास विरोध केला तेव्हा दीराने रात्रीच्या वेळी येऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसवण्यात आला अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.

सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून हि महिला काही दिवस माहेरी गेली होती. पुन्हा सासरी आली. तिथे गेल्यावर सासरच्या लोकांनी तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. एक दिवस हि पीडित महिला तिच्या खोलीत झोपली होती, तेव्हा दीर अचानक तिच्या खोलीत आला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवू लागला. कशीबशी सुटका करून घेत तिने भावाचे घर गाठले. यानंतर ते पोलीस अधीक्षकांच्या घरी गेले. या प्रकरणाची गंभीरता पाहून महिलेची तक्रार नोंद करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here