हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तिरुवनंतपुरममध्ये युट्युबवर एक व्हिडिओ पाहून घरीच प्रसुती करण्याचा हट्ट केल्यामुळे एका महिलेने नवजात बाळासह स्वतःचा जीव गमावला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या 36 वर्षीय महिलेच्या पतीने आपल्या पत्नीकडे घरीच प्रसूती करण्याचा हट्ट केला होता. परंतु घरातच बाळाला जन्म देताना या महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी केरळ येथील तिरुवनंतपुरमच्या नेमोम परिसरात घडली आहे.
युट्युबवर पाहून प्रसूती…
समोर आलेल्या माहितीनुसार, नेमोम परिसरातील नायसने आपल्या पहिल्या पत्नीसोबत यूट्यूबवर प्रसूतीचा एक व्हिडिओ पाहिला होता. यावरूनच त्याने दुसरी पत्नी असणाऱ्या शेमीरा बीवी हिची देखील घरीच घरीच करण्याचा हट्ट पकडला. शेमीरा बीवी हिचे अगोदर तीन सिजर झाले होते. यानंतर तिला मंगळवारी प्रसूती कळा येऊ लागल्या. तसेच रक्तस्त्राव देखील होऊ लागला. त्यामुळे नायस आणि त्याच्या पहिल्या पत्नीने शेमीराची घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी देखील युट्युबवर पाहून प्रसूती करण्याचे सर्व प्रयत्न केले.
आरोपी पतीला झाली अटक
परंतु या प्रयत्नामुळेच शेमीरा कोमात गेली. त्यामुळे तिच्या पतीने लगेच खाजगी रुग्णवाहिका बोलावून तिला हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर बाळाचा आणि महिलेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबाला सांगितले. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी पती नायस विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आणखीन कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या या घटनेमुळे परिसरात देखील खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांना या घटनेप्रकरणी नगरसेविका दीपिका यांनी माहिती दिली की, आरोपी नायस हा आपल्या पत्नीवर आधुनिक उपचार करण्यास नकार देत होता. यावरून आशा वर्कर्सने कुटुंबाला संपर्क साधण्याचा आणि पत्नीला भेटण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु नायसने आशा वर्कर्सला आपल्या पत्नीला भेटू दिले नाही. नायसच्या मृत पत्नीची अगोदरच तीन वेळा सिझेरियन पद्धतीने प्रसुती झाली होती. त्यामुळे तिची नॉर्मल पद्धतीने डिलिव्हरी करणे शक्य नव्हतं. त्यामुळे पुन्हा सिझर करण्यास नायसने नकार दिला. यात घरीच प्रसूती केल्यामुळे महिला आणि बाळाला जीव गमवावा लागला.