धनंजय मुंडेंना महिलेची धमकी; 5 कोटी द्या, अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करेन

dhananjay-munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना दिली असून मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर सदर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली.

तसेच धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. 5 कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, अशी मागणी सदर महिलेने धनंजय मुंडे यांना केली . तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली.

धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या धमकी नंतर एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये दिले होते, तसेच 1 महागडा मोबाईल कुरिअर केला होता. मात्र आता या महिलेने 5 कोटीची मागणी केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी पोलीस तक्रार केली. दरम्यान, ही महिला कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत