सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
बनपुरी ता पाटण येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचनानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. गावातील शाळेत तिला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते. वाटेतच तिचा मुत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नसून ती व्यक्ती क्वारंटाईन असल्याने तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाने विभागात शिरकाव केला की काय या, भीतीने विभागास बनपुरी गांवात एकच खळबळ उडाली आहे. ढेबेवाडी, तळमावले बाजापेठ बंद ठेवण्यात आली आहे.
बनपुरी येथे शनिवारी १६ रोजी मुंबई येथून प्रवासी आलेल्या अंदाजे 43 वर्षीय महिलेला बनपुरी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. रविवारी दिनांक १७ रोजी रात्री तिला अचानक त्रास जाणवू लागल्याने कराडला हलवण्यात आले. दरम्यान तिचा वाटेतच मृत्यू झाला. यानंतर तिला गावात आणण्यात आले. मात्र कारण समजले नसल्याने उपसरपंच शिवाजी पवार , पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, ग्रामसेवक तानाजी जाधवर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना मिना सांळुखे यांना संपर्क केला. पाटण चे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटण तालुक्यात वैद्यकीय अधिकारी पाटील साहेब,सळवे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डाॅक्टर बनें, आरोग्य सेवक भांडे यांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर तिला कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती उपसरपंचांनी दिली. तिच्या मृत्यूचे खरे कारण समजले नसले तरी या घटनेमुळे बनपुरी परिसरास ढेबेवाडी विभागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढेबेवाडी तळमावले बाजारपेठ पुर्ण बंद ठेवण्यात आली आहे.
#BreakingNews | सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मुंबईहून आलेल्या आणि शाळेत क्वारंटाइनमध्ये असलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाला आहे. कोरोना अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.#HelloMaharashtra #coronavirus pic.twitter.com/7gjeLiKg6w
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 18, 2020
ढेबेवाडी विभागात मुंबईवरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे आता खरी कसोटी असून प्रत्येकाने खबरदारी घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे. विभागात एकही संशयित सापडला नसल्याने प्रशासनाने बाजारपेठ काही नियम अटीवर सुरू केली होती. मात्र या घटनेमुळे व मुंबईवरून येणाऱ्या लोकांमुळे पुन्हा काही दिवस बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. नगरपालिकेने तयार केलेल्या कोविड स्मशानभूमीत या महिलेवर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार पार; तर आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू #hellomaharashtra #covid19 https://t.co/aM55Ay5caV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 18, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.