Budget 2023 : अर्थसंकल्पाकडून महिलांच्या ‘या’ अपेक्षा, इन्कम टॅक्समध्ये मिळू शकेल खास सवलत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशा स्थितीत या अर्थसंकल्पात महिलांना करसवलत मिळणार का ??? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या अर्थसंकल्पात महिलांचा व्यवसायातील सहभाग वाढवण्यावर भर दिला जाईल, अशी महिलांना आशा आहे. RBI च्या सर्वेनुसार, देशातील फक्त 14 टक्के MSMEs महिलांच्या मालकीच्या आहेत. तसेच, 5.9 टक्के स्टार्टअप महिलांचे आहेत.

Budget 2023: Date, timings, expectations, who will present it? All you need to know - BusinessToday

महिलांना टॅक्स स्लॅबमध्ये लाभ मिळणार का ???

वित्त कायदा 2012 ने टॅक्स स्लॅबमधील फरक दूर करत पुरुष आणि महिलांसाठी एक समान टॅक्स स्लॅब आणला. हे लक्षात घ्या कि, 2012 पर्यंत महिलांना पुरूषांपेक्षा किंचित जास्त टॅक्स बेनिफिट दिली जात होते. तज्ज्ञांच्या मते, नोकरदार महिलांच्या भविष्याचा विचार करून त्यांना जास्त कर सवलती मिळायला हव्यात. तज्ज्ञांच्या मते, टॅक्स स्लॅबमधील सूट ही व्यक्तीच्या वयानुसार लागू असावी, लिंगाशी संबंधित नाही.

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेलॉइट इंडियाचे पार्टनर असलेले सुधाकर सेथुरामन म्हणाले की,”इन्कम टॅक्स स्लॅब दरांमध्ये एकसमान सूट ही सध्याच्या काळाची महत्त्वाची मागणी आहे. तसेच सर्वांची मागणी पूर्ण करण्याऐवजी अर्थमंत्री फक्त नोकरदार महिलांना हे फायदे देऊ शकतात.” Budget 2023

India mulls lowering income tax rates in budget 2023: Report - Hindustan Times

ते पुढे म्हणाले की,” महिलांची बचत करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा चांगली असली तरी हा अर्थसंकल्प महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम बनवेल. उज्ज्वला योजना यांसारख्या विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्वाकडे भारताची दृष्टी आणि प्रयत्न लक्षात घेऊन, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सुकन्या समृद्धी खाते’ आणि ‘सैनिक स्कूल’ यासारख्या हाय-प्रोफाइल स्कीम आहेत. याद्वारे फक्त महिलांना करात सवलतच मिळत नाही तर यामुळे देशाचाही विकासही होतो. ”

ग्लोबल मोबिलिटी प्रॅक्टिस PwC इंडियाचे माजी नॅशनल लीडर म्हणतात की,” महिलांना कर सवलत दिल्याने महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. कोरोना महामारीच्या काळात अनेक महिलांनी आपल्या पतीला गमावले, जे त्यांच्या घरातील उत्पन्नाचे एकमेव साधन होते. अशा परिस्थितीत महिलांना मुलांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. त्याचप्रमाणे सिंगल पालकांना देखील करात सूट देण्यात यावी. मात्र, सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘उज्ज्वला योजना’ यांसारख्या अनेक योजनांद्वारे याआधीच कर सवलत दिली जात आहे. Budget 2023

Budget 2023: 5 income tax relief measures that middle class expects from FM Nirmala Sitharaman | Mint

सध्याचा टॅक्स स्लॅब

हे जाणून घ्या कि, सध्या देशात दोन टॅक्स स्लॅब आहेत. यातील एक जुना टॅक्स स्लॅब म्हणून ओळखला जातो, तो बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे, तर नवीन टॅक्स स्लॅब 2020 मध्ये लाँच करण्यात आला. जुन्या स्लॅबमध्ये 5%, 20% आणि 30% असे तीन स्लॅब आहेत, तर नवीन स्लॅबमध्ये – 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30% असे स्लॅब आहेत. ज्या अंतर्गत सर्व डिडक्शन आणि सवलती उपलब्ध आहेत. तसेच कोणत्या टॅक्स स्लॅब अंतर्गत इन्कम टॅक्स भरावा हे सरकारने करदात्यांवर सोडले आहे. मात्र नवीन टॅक्स सिस्टीममध्ये अनेक सवलती उपलब्ध नाहीत, ज्यामुळे बहुतेक लोकं जुन्याच टॅक्स स्लॅबमधूनच इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. Budget 2023

नवीन टॅक्स स्लॅब असा असू शकेल

जर सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला तर सवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवता येईल, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. सध्या 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम रिटर्न भरणे आवश्यक आहे. नव्या स्लॅबनंतर ही मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढणार आहे. Budget 2023

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???