यावर्षीही बचत गटाच्या महिलांना मिळणार ‘मिनी ट्रॅक्टर’ योजनेचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : महिला बचत गटांमार्फत महिला सक्षम करण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या स्वंयसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत प्रयत्न केले जाते. यात बचत गटांना अर्थसाहाय्य दिले जाते. त्यातून त्या मिनी ट्रॅक्टर घेऊन त्यातून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळते.  यावर्षी देखील मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ दिला जाणार असून महिला बचत गटांनी २५ मार्च पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले.

जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी  शासनाने २०१२- १३ या आर्थिक वर्षामध्ये मिनी ट्रॅक्टर योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना लाभ दिला जातो. आतापर्यंत बऱ्याच महिलांना याचा लाभ देखील मिळाला आहे. त्यात स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावे, अशी अट आहे.

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी असून स्वयंसहाय्यता बचत गटाचा स्वहिस्सा १०% भरल्यानंतर शासकीय अनुदान ९०% म्हणजेच ३ लाख १५ हजार इतके देण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा लाभ यापूर्वी देण्यात आला आहे, अशा बचत गटांना मिनी ट्रॅक्टर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. याशिवाय ज्या बचत गटांनी मागील वर्षी अर्ज सादर केले आहेत परंतु त्यांना लाभ मिळाला नाही अशा बचत गटांना नव्याने अर्ज सादर करावे लागेल.

बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे. बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकशी संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच ज्या बचत गटांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना वगळुन इतर बचत गटांच्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांनी २५ मार्च पर्यंत अर्ज समाजकल्याण विभागात सादर करणे अनिवार्य असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment