महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाºयाच्या पतीने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या दिलीप गवळी केल्याची घटना नक्षत्रवाडी येथे घडली. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप रामकिसन गवळी (४०)असे मृताचे नाव आहे.

दिलीप हे नक्षत्रवाडी येथे आई वडिलांसोबत राहात होते. तर त्यांची पोलीस पत्नी माहेरी नक्षत्रपार्कमध्ये राहात. त्यांना १४ वर्षे आणि १० वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. दिलीप हे किराणा दुकान चालवित होते. मात्र, लॉकडाऊनपासून त्यांचे दुकान बंद पडले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला, ही बाब मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास नातेवाइकांना दिसताच त्यांचा भाऊ सचिन गवळी आणि सासºयांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले, अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून पहाटे 3:30 वाजता मृत घोषित केले.

याप्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शनिवारी सकाळी धाटीत त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाइकानी आमची तक्रार असल्याचे सांगून गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी आधी अंत्यसंस्कार करून घ्या. तुम्हाला कधीही तक्रार करता येईल, असे पोलिसांनी त्यांना सांगून समजूत काढली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नेले. पोलीस हवालदार लक्ष्मण इथापे तपास करीत आहेत. दिलीप यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group