Monday, February 6, 2023

दिवाळीपूर्वी ‘या’ बँकांनी स्वस्त केले Home Loan, आता आपला EMI किती कमी झाला हे जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । जर आपण देखील होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. HDFC Ltd ने प्राइम लेंडिग रेट्स 10 बेस पॉईंटने कमी केलेले आहेत. हाउसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC ने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. एचडीएफसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या कपातीचा लाभ विद्यमान सर्व HDFC रिटेल होम लोन आणि बिगर-होम लोन ग्राहकांना उपलब्ध होईल. हे नवीन दर आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून लागू होतील, त्यानंतर आज ग्राहकांना स्वस्त होम लोन मिळेल.

HDFC ने निवेदन प्रसिद्ध केले
HDFC ने एक निवेदनात म्हटले आहे की, ते आपले रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 10 बेस पॉईंटने कमी करीत आहे. एचडीएफसी RPLR च्या आधारे आपल्या होम लोन वरील फ्लोटिंग रेट्स ठरवते. म्हणजेच, RPLR हा त्याचा बेंचमार्क लेंडिग रेट आहे. HDFC च्या वेबसाइटनुसार होम लोन वरील व्याज दर 6.90 पासून सुरू होत आहे.

- Advertisement -

सर्व ग्राहकांना लाभ मिळेल
HDFC ने कमी केलेल्या कर्जाच्या रेटचा फायदा सर्व विद्यमान तसेच नवीन ग्राहकांना होईल.

BoB ने देखील स्वस्त केले होम लोन
यासह बँक ऑफ बडोदाने (BoB) रेपो दराशी संबंधित लोन इंट्रेस्ट रेट सात टक्क्यांवरून 6.85 टक्क्यांवर आणले आहेत. 1 नोव्हेंबर 2020 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत.

Canara bank ने ही व्याज दर कमी केले
सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) 0.05 वरून 0.15 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. बदललेले हे दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेच्या 1 वर्षाच्या कर्जावर MCLR मध्ये 0.05 टक्के कपात करण्यात आली आहे. आता हे नवीन दर 7.40 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.

युनियन बँकेनेही कमी केले होमलोन
युनियन बँक ऑफ इंडियानेही होमलोन स्वस्त केले आहेत. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 0.10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. महिला अर्जदारांना अशा कर्जावरील व्याज दरामध्ये 0.05 टक्क्यांहून अधिक सूट मिळणार आहे. अशा प्रकारे महिला अर्जदारांसाठी 0.15 टक्के स्वस्त व्याज दर मिळेल.

बँकेने ही सुविधा दिली
याशिवाय युनियन बँक असेही म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत होम लोन वरील प्रोसेसिंग फीसही कमी केली आहे. होमलोन घेतल्यास 10 हजार रुपयांपर्यंतची सवलतही बँकेने देऊ केली आहे. 1 नोव्हेंबर 2020 पासून ही सूट लागू आहे असे बँकेने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.