सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
नेमिनाथनगर येथील अरहंत ड्रेडर्स मधील एका कामगाराने व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली ५ लाख ९ हजार रुपयांची रक्कम स्परस्पर लांपास करून गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार विशाल काटे यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी राहत मुश्रीफ याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल काटे यांचे अरहंत ट्रेडर्स नावे राजमती कॉम्प्लेक्स नेमिनाथनगर येथे ऑफिस आहे. त्यांच्याकडे सनी ऑईल आणि वाघ बकरी चाय यांची एजन्सी आहे. एजन्सी असल्याकारणाने हे सांगली आणि मिरज मध्ये दुकानदारांना माल विकतात. त्यांच्याकडे राहत हुसेन गुलाबहुसेन हा कामाला होता. माल घेतलेल्या दुकानदारांना पावती देऊन त्यांच्या कडून पैसे जमा करून घेतले जात होते. राहत हुसेन गुलाबहुसेन याने ऑफिस मधून कुणालाही माहित न होता दुसरे पावती बुक स्वतःच्या जवळ ठेवले होते. तो सांगली आणि मिरज मधील दुकानदारांकडून पैसे जमा करून घेत असे आणि त्या दुकानदारांना ऑफिस मधून परस्पर घेतलेल्या पावती बुकातील पावती देत असे. मात्र ते पैसे तो अरहंता ड्रेडर्स मध्ये जमा करीत नव्हता.
एकीकडे दुकानदार नेहमी प्रमाणे पैसे जमा करीत होते. मात्र ते पैसे ऑफिस मध्ये जमा नसल्याने दुकानदारची उधारी वाडुन दिसत होती. उधारी का वाढत आहे हे पाहण्यासाठी स्वतः मालक दुकानदारांच्या कडे गेले असता. राहत हुसेन गुलाबहुसेन याने केलेली आर्थिक फसवणूकिचा उलघडा झाला. ऑफिस मधील जमा आणि दुकानदारांकडे येणे बाकी पाहता ही फसवणूक ५ लाख ९ हजार रुपयांची असल्याचे समोर आली आहे. याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली असून संशयित आरोपी राहत हुसेन गुलाबहुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा