कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीचे पैसे थकवने पडले महागात; मालकासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद:  कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीचे पैसे थकविल्याप्रकरणी वाळुज एमआयडीसीतील मनिषा इंटरप्राईजेस कंपनीच्या मालकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा नितीन तांबे आणि किरण साईनाथ तांबे अशी कामगारांची फसवणूक केलेल्या कंपनी मालकांची नावे आहेत.

या दोघांनी ११ लाख ३७ हजार ३८२ रुपये थकविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रांजणगाव शेणपुंजी भागातील श्रीरामनगरात मनिषा इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत ८४ कामगार कामाला आहेत. चलनाद्वारे प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत भविष्य निर्वाहनिधीची रक्कम जमा करणे बंधनकारक असताना कंपनीने सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीतील ८४ कामगारांची भविष्य निर्वाहनिधीचे ११ लाख ३७ हजार ३८२ रुपये भविष्यनिधी आयुक्त कार्यालयात जमा केले नाही.

यासंदर्भात कार्यालयातील मुक्तेश्वर गौरीशंकर व्यास (५३) यांनी ६ एप्रिल रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. तत्पुर्वी २३ फेब्रुवारी रोजी कंपनीला लेखी नोटीसव्दारे कंपनीला विचारणा केली होती. मात्र, मालक मनिषा तांबे व किरण तांबे यांनी रकमेच्या भरणाबाबत असमर्थता दाखविली. त्यावरुन एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

Leave a Comment