जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज यांनी बाळासाहेबांना ‘गुरु’ म्हणून अशी दिली होती मानवंदना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । व्यंगचित्रकार म्हटलं कि महाराष्ट्रात एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आपल्या ब्रशच्या फाटकाऱ्यातून कित्येकांना झोडपणारे बाळासाहेब अवघ्या महाराष्ट्रानं पहिले आहेत. बाळासाहेबांच्या याच कलागुणांचा प्रभाव ठाकरेंच्या पुढच्या पिढीतील राज ठाकरे यांच्यावर पडला. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या राज ठाकरेंचं १९९९ सालचं ‘चेहरे मोहरे’ हे पहिलं प्रदर्शन म्हणजे दोन्ही गुरूंना दिलेली मानवंदना होती. आज ‘जागतिक व्यंगचित्रकार दिन’. या निम्मितानं राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रदर्शनाची झलक दाखवणारी चित्रफीत आपल्या ट्विटर अकॉउंटवर शेअर केली आहे. या चित्रफितीत अनेक दिग्गज मंडळींनी या प्रदर्शनाला हजेरी लावलेली दिसते. तसेच यात राज यांच्या अनेक व्यंगचित्रांची झलक पहायला मिळत आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त चला तर पाहूया.. महाराष्ट्रातील राज ठाकरे या उमद्या व्यंगचित्रकाराच्या या पहिल्या व्यंगचित्र प्रदर्शनाची झलक..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment