World Cup 2023 : भारताला मोठा झटका!! हा मॅचविनर खेळाडू वर्ल्डकप मधून OUT

World Cup 2023 Hardik Pandya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु असून भारताने आतापर्यंत दणदणीत कामगिरी करत सर्वच्या सर्व ७ सामने दिमाखात जिंकले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर दमादर कामगिरी केल्याने यंदा भारतीय टीमच ही विश्वचषक स्पर्धा जिंकेल अशी अशा व्यक्त केली जात आहे हे सर्व होत असताना मात्र भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वर्ल्डकप मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हार्दिक विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

हार्दिकला नेमकं काय झालं? World Cup 2023

हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा अत्यंत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याची पूर्ण ओव्हर देखील पूर्ण होऊ शकली नाही. या कारणामुळे त्यास आराम करण्यासाठी टीम बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे तो न्यूजीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेसोबत खेळू शकला नाही. मात्र आता तर हार्दिक थेट स्पर्धेबाहेरच (World Cup 2023) पडला आहे. त्यामुळे भारतीय संगःसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या बदली प्रसिद्ध कृष्णाला संघात घेतलं आहे.

कोण आहे कृष्णा?

ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या वनडे मॅच मध्ये प्रसिद्ध कृष्णाने आपला धमाका दाखवून दिला होता. कृष्णाचा हा पहिला वर्ल्डकप असणार आहे. त्याने आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 29 विकेट स्वतःच्या नावावर घेतल्या आहेत. कृष्णाच्या नावाने इंटरनॅशनल पातळीवर एकूण 33 विकेट आहेत.

भारत गेला सेमी फायनल मध्ये

2 नोव्हेंबरला झालेल्या श्रीलंके विरुद्ध केलेली कामगिरी डोळ्याचं पारणं फेडणारी होती. लंकेचा केवळ ५५ धावांत खुर्दा करत भारताने 302 धावांनी विजय मिळवला आणि सेमी फायनल मध्ये आपली जागा नक्की केली. भारताचा पुढील सामना 5 तारखेला होणार असून तो कोलकत्ता मध्ये दक्षिण अफ्रीके सोबत होणार आहे.