नवी दिल्ली । जगातील सर्वात जास्त अब्जाधीश चीनची राजधानी बीजिंग (Beijing) मध्ये राहतात. फोर्ब्स (Forbes) या बिझनेस मॅगझिनच्या अब्जाधीशांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या लिस्टमध्ये हे उघड झाले आहे. एका अहवालानुसार, गेल्या वर्षी बीजिंगमध्ये 33 नवीन अब्जाधीशांची भर पडली. याबाबत बीजिंगने आता न्यूयॉर्कला (New York) मागे टाकले आहे आणि चौथ्या स्थानावरुन ते पहिल्या स्थानावर आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये न्यूयॉर्क या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. फोर्ब्सच्या लिस्टनुसार बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या 100 वर गेली आहे. त्याच वेळी न्यूयॉर्कमधील अब्जाधीशांची संख्या 99 वर पोहोचली आहे.
अब्जाधीशांसह टॉप 10 शहरांची लिस्ट
1. बीजिंग
2. न्यूयॉर्क
3. हाँगकाँग
4. मॉस्को
5. शेन्जेन
6. शांघाय
7. लंडन
8. मुंबई
9. सॅन फ्रान्सिस्को
10. हांग्जो
अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार अमेरिकेमध्ये कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक 724 अब्जाधीश आहेत. यानंतर चीन 698 अब्जाधीशांसह असून भारत 140 अब्जाधीशांसह तिसर्या क्रमांकावर आहे. यानंतर जर्मनी आणि रशिया क्रमांकावर आहेत. Amazon चे सीईओ आणि संस्थापक जेफ बेझोस सलग चौथ्या वर्षी जगातील अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये टॉप वर आहेत. फोर्ब्सने सांगितले की, बेझोसची संपत्ती 177 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, जी एका वर्षापूर्वीच्या 64 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
या लिस्टमध्ये स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क हे देखील आहेत, ज्यांची संपत्ती डॉलरच्या बाबतीत सर्वात जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मस्कची एकूण मालमत्ता 126.4 अब्ज डॉलर्सने वाढून 151 अब्ज डॉलर्स झाली. गेल्या वर्षी तो 24.6 अब्ज डॉलर्ससह 31 व्या स्थानावर होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा