सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे आकडे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पाॅझिटीव्हचा दर वाढला आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांचा टप्पा पार करून 12 हजार 903 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये दीड हजारांचा टप्पा पार केला आहे. आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 543 जण कोरोनाबाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 80 हजार 462 आहे. तर जिल्ह्यात एकूण 66,721 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 12 हजार 903 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. काल बरे होवून 595 बांधितांना घरी सोडले आहेत. तर आजपर्यंत 2065 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा