चिंताजनक! गेल्या 24 तासात 48 नवे कोरोना रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या पन्नास खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात 48 रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील एकोणवीस ग्रामीण भागातील 21 रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 463 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील नव्या रुग्णांची संख्या सलग 13 व्या दिवशी वीस खाली राहिली. त्यात ही सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या 50 खाली आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 414 रुग्णांवर तर शहरात अवघ्या 49 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 528 एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 620 कोरोना मुक्त झाले आहेत. आजपर्यंत 6,445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील 12 आणि ग्रामीण भागातील 37 अशा 49 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, पैठण येथील 28 वर्षीय महिला, शहरातील शंभूनगर, गादिया विहार येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण घाटी मध्ये 1, इटखेडा पैठण रोड 1, संदेशनगर 2 धुत हॉस्पिटल जवळ 1, एन -7 येथे 1, सातारा परिसर 2, एसआरपीएफ कॅम्प 1, चिकलठाणा 1, जय भवानी नगर 1, अन्य 8, आणि ग्रामीण भागातील रुग्ण औरंगाबाद 2, गंगापूर 8, खुलताबाद 1, वैजापूर 15, पैठण 3 अशी कोरुना रुग्णांची संख्या आहे.

Leave a Comment