औरंगाबाद | जिल्यात आठवडाभर कोरोना रुग्णाची संख्या 50 च्या आत होती, गुरुवारी यात किंचित वाढ झाली आहे नव्याने 71 रुग्णाची भर पडली आहे. यास प्रामुख्याने ग्रामीण मधील पैठण आणि वैजापूर तालुक्यामध्ये अचानक रुग्ण वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णवाढीमुळे उपचार घेणार्यांचा आकडा 471 वर पोहचला आहे.
जिल्हात शहरी भागातील कोरीना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. ग्रामीण मध्ये अजूनही काही तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सलग आठवडाभरापासून ग्रामीण मधील दैनिक रुग्ण वाढ 30 च्या आत कायम होती.पैठण तालुक्यात अचानक 24 तर वैजापूर मध्ये 13 रूग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने ग्रामीणमध्ये चाचणी वाढविण्याचे निर्देश दिले असून त्यातुन ही वाढीव रुग्णांची आकडेवारी पुढे आल्याचे बोलले जात आहे. 20 च्या आत असलेली शहरातील रुग्णवाढ गुरुवारी 21 वर गेली आहे. त्यात प्रामुख्याने एन-3 ठाकरेनगर आणि एस टी कॉलनीत प्रत्येक 3 रुग्ण आढळले आहेत.गवळाई परिसरात 2, गोल्ड सिटी पैठण रोड 1, औरंगपूरयातील सन्मित्र कॉलेटी 1, छावनी 1, हर्सूल टी पॉइंट 1, हारसुल 1, अविष्कार कॉलनी 1, चौधरी कॉलनी 1, मुकुंदवाडी 1, चिकलठाणा 1 अशी रुग्णवाढ संख्या झाली आहे.