सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 110 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 281 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 25 हजार 950 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 33 हजार 270 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 4 हजार 272 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3061 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी दिवसभरात 48 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड- 00300, आयएफएससी कोड SBIN0000300. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba