हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो. विशेषतः मुलांचे शिक्षण, लग्न यामध्ये होणार खर्च भरून काढण्यासाठी ते अनेक योजना बनवतात. आपल्या मुलांना योग्य आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र या सर्वांसाठी म्यूचुअल फंड हा योग्य पर्याय ठरू शकतो.
म्यूचुअल फंडमध्ये मुलांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांना चिल्ड्रेन फंड असे म्हंटले जाते. साधारणतः चिल्ड्रेन फंडमध्ये 5 वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो. हे शक्यतो हाइब्रिड स्कीमवाले असतात. यामधील 65-80 टक्के हिस्सा हा इक्विटीमध्ये गुंतविला जातो आणि बाकीचा हिस्सा बॉन्डमध्ये म्हणजेच डेट मार्केटमध्ये गुंतविला जातो. यामुळे शेअर बाजारातील चढ उताराचा यावर काहीही परिणाम होत नाही.
या फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल का ?
चिल्ड्रेन फंड मधील गुंतवणूकीचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. 5 वर्षांचा लॉक-इन पीरियड असल्याने चिल्ड्रेन फंड मध्येच बंद करता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, असे फंड ग्राहकांना मानसिक फायदे देतात. मुलाच्या नावावर पैसे गुंतवलेले असल्याने गुंतवणूकदार मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढत नाहीत. परंतु जर आपण टॅक्स बाबत बोलायचं झालं तर यापैकी बहुतेक योजना इक्विटी फंड असल्याने त्यांचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (एक वर्षापेक्षा जास्त कालावधी) 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 10 टक्के दराने कर आकारला जातो.