‘हनुमान हे प्राणीच’, ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांचं वादग्रस्त वक्तव्य

writer uttam kamble
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – हनुमान जन्मस्थळ वादात आता ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे (writer uttam kamble) यांनी उडी घेतली आहे. विशेष म्हणजे हनुमान जन्मस्थळावरुन राज्यात सुरु झालेला वाद आता कुठेतरी शमत असताना ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे (writer uttam kamble) यांनी हनुमानाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राण्यांची जन्मतारीख कोण लिहून ठेवणार, हनुमान हे प्राणीच होते, असे वक्तव्य ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे (writer uttam kamble) यांनी केले आहे.

नेमके काय म्हणाले लेखक उत्तम कांबळे?
“क्रांती ही सलमान खानच्या चित्रसारखी किंवा हनुमानाची जन्मतारीख सांगण्यासारखी नसते. किती उपद्रव झालं राव आमच्या नाशिकमध्ये. अरे त्यावेळी तलाठी नव्हता. मग प्राण्यांची जन्मतारीख कोण लिहून ठेवणार? हनुमान हे प्राणीच ना”, असं वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे (writer uttam kamble) यांनी केले आहे. जालन्यात कॉ. अण्णा सावंत लिखित ‘फुलटायमार’ या आत्मकथनाचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हनुमान जन्मस्थळाचा वाद नेमका काय?
काही दिवसांपूर्वी हनुमान जन्मस्थळावरुन वाद उफाळला होता. यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यात राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. रामाचे जन्मस्थान अयोध्या आहे, पण रामभक्त हनुमानजींचे जन्मस्थान कुठे आहे? कर्नाटकातील किष्किंधा की महाराष्ट्रातील अंजनेरी? या प्रश्नावरून महाराष्ट्रात वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांनी (writer uttam kamble) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा