हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोना या जागतिक महामारीचा प्रकोप दाखवन्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरती भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. भारताच्या नकाशामध्ये जम्मू – काश्मीर आणि लडाख यांना भारतापासून वेगळे दाखवले आहे. या प्रदेशाला पूर्णपणे वेगळा रंग दिला असल्यामुळे तो भारताचा हिस्सा नाही असा प्रथमदर्शनी वाटून येत आहे.
प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या जम्मू- काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना राखाडी रंग दिला असून इतर भारतीय प्रदेश हा फिकट निळ्या रंगाचा दाखवला आहे. त्यासोबतच ‘अक्साई चीन’ या प्रदेशाची वाद्ग्रस्त सीमाही राखाडी आणि निळ्या रंगाने दर्शवली आहे. तो रंग चीनच्या रंगाशी साम्य दाखवणारा आहे. मध्यंतरी ‘डब्ल्यू एच ओ’ संस्थेने चीनची भरपूर वेळा पाठराखण केली आणि चीनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याही वेळेस ‘डब्ल्यू एच ओ’मध्ये चीनचा हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावरही यावर टीका होत आहे. चीनच्या इशाऱ्यावरून भारताच्या नकाशातून जम्मू काश्मीर, लडाख आणि अक्साई चीनचा प्रदेश वेगळा दाखवण्यात आला आहे का अशी शंकाही यातून निर्माण होते आहे. हा वेगळा प्रदेश वेगळ्या रंगाने दाखवल्यामुळे तो भारतापासून पूर्ण वेगळा आहे अशीच प्रथमदर्शनी समज निर्माण होऊ शकतो. ‘डब्लू एच ओ कोविड -१९ ससिनॅरिओ डॅशबोर्ड’ मध्ये हा नकाशा उपलब्ध करून दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’