मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्याअगोदर न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेंसन यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना जेव्हा टीम इंडियाचा कोणता खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल? असा प्रश्न तेव्हा त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा किंवा चेतेश्वर पुजारा यांचे नाव न घेता ऋषभ पंत हा आमची डोकेदुखी ठरू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले शेन जुर्गेंसन
‘ऋषभ पंत धोकादायक खेळाडू आहे, जो एकट्याच्या जीवावर मॅचचा निकाल बदलू शकतो. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. तो सकारात्मक विचार असलेला खेळाडू आहे. त्याची विकेट घेणे खूप महत्वाचे असणार आहे. यासाठी तो संधीही देतो.आमच्या बॉलरनी चांगली बॉलिंग करून पंतला रन बनवण्यापासून रोखण्याची गरज आहे. जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला रोखणे फार कठीण असते. यावर आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे असे शेन जुर्गेंसन म्हणाले आहेत.
न्यूझीलंडकडे ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासारखे अनुभवी बॉलर असतानाही जुर्गेंसन यांनी काईल जेमिसनचे कौतुक केले आहे. काईल जेमिसन यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला. ‘आयपीएलमध्ये विराट आणि जेमिसनने नक्कीच चर्चा केली असेल, जी फायनलमध्ये बघायला मज्जा येणार आहे कारण त्याचे टेस्ट करियर आतापर्यंत शानदार राहिले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये आम्हाला तयारीची चांगली संधी आहे असे देखील शेन जुर्गेंसन म्हणाले.
भारतीय बॉलरसंदर्भात शेन जुर्गेंसन काय म्हणाले ?
‘भारताकडे आव्हानात्मक बॉलिंग आक्रमण आहे. त्यांच्याकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही जसप्रीत बुमराहपासून ते शार्दुल ठाकूरपर्यंतचा सामना करू शकतो. शार्दुल चांगला ऑलराऊंडर आहे, ऑस्ट्रेलियातही त्याने चांगली कामगिरी केली होती. मोहम्मद सिराजसुद्धा चांगला फॉर्ममध्ये आहे. एवढेच नाहीतर भारताचे स्पिनरसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. असे वक्तव्य शेन जुर्गेंसन यांनी केले आहे.