WTC Point Table : रोहितसेना जगात भारी; नंबर 1 वर पोचली टीम इंडिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WTC Point Table : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. WTC पॉईंट टेबल मध्ये भारतने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतंच न्यूझीलंडचा पराभव केल्याचा फायदा भारताला झाला आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया टॉप ला गेली. WTC क्रमवारीत भारतीय संघाचे ६४.५८ गुण आहेत.

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. घरच्या मैदानावर सुरु असलेल्या इंग्लड विरुद्धच्या ५ कसोटी मालिकेत भारताने आत्तापर्यन्त ३-१ असे वर्चस्व गाजवलं आहे. दमदार फलंदाजी आणि त्याला मिळालेली फिरकीपटूंची जोड यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला चारी मुंड्या चीत केलं आहे. आता ७ तारखेपासून धर्मशाला येथे दोन्ही संघामध्ये पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून त्यापूर्वीच टीम इंडिया टॉप वर पोचली आहे. आता पाचवी कसोटी जिंकून आपलं प्रथम स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न रोहितसेनेचा असेल.

भारताच्या विजयाची टक्केवारी 64.58- WTC Point Table

भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2023-2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळाला असून 2 सामने गमावले आहेत. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने WTC 2023-25 ​​मध्ये 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 3 जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. सध्या भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 64.58 आहे. न्यूजीलँडच्या विजयाची टक्केवारी 60.0 आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ५९.०९ आहे. भारतानी धर्मशाळा येथील इंग्लंड विरुद्धचा पाचवा कसोटी सामना जिंकला तर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.51 होईल. तसेच न्यूझीलंडने जरी शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका बरोबरीत सोडवली तरी भारताचे WTC मधील पहिले स्थान (WTC Point Table) कायम राहील.