Xiaomi चा Mi Smart Band 6 झाला लाँच, SpO2 (ब्लड ऑक्सीजन मेजरमेंट) चा मिळणार सपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाओमी कंपनीचा बँड ६ हा नवीन डिवाइस चीन च्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. नेहमी ग्राहकांच्या गरजेचा विचार करून कमी किंमतीत नवनवीन फीचर्स देण्यात शाओमी कंपनीचा हातखंडा आहे. शाओमी जे नवनवीन गोष्टी देतं ते इतर कुणी देत नाही आणि देऊ पण शकत नाही. नवीन पिढीला आकर्षित करण्यास कंपनी यशस्वी झाली आहे. भारतीय बाजारपेठत वेअरेबल डिवाइस क्षेत्रात शाओमी चा वाटा ४८ % आहे. यातच आपल्याला लक्षात आले असेल कि कंपनी किती लोकप्रिय डिवाइस लोकांपर्यंत पोहचवत आहे. आतापर्यंत एकूण ४ फिटनेस बँड कंपनीकडून बाजारात आणले गेले. ते सर्वच्या सर्व हातोहात विकले गेले. लोकांना काय हवं आहे याची अचूक नस कंपनीला सापडली आहे. प्रत्येक नवीन वर्षी काहीतरी गरजेचे फिचर यात ऍड केले जाते, यावर्षी ब्लड ऑक्सिजन (SpO२) हे महत्वाचे फिचर ऍड केलंय, जे कोरोना काळात आपल्याला आपल्या शरीरात ऑक्सिजनची लेव्हल किती आहे हे समजून येते

शाओमी मी स्मार्ट बँड ब्लॅक, ऑरेंज, यलो, ऑलीव, आयवरी आणि ब्लू अशा ६ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही २ व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. एक व्हेरियंट NFC सोबत येते . तर दुसऱ्या व्हेरियंट मध्ये NFC सपोर्ट मिळत नाही. मी बँड ६ फिटनेस बँड ३० एक्सरसाइज मोड सपोर्ट करतो. आउटडोर रनिंग, वॉकिंग ट्रेडमिल, रनिंग आउटडोर सायकलिंग, रोइंगला ऑटो डिटेक्ट करते. मी बँड ६ मध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग (PPG), SpO2 (ब्लड ऑक्सीजन मेजरमेंट) चे सपोर्ट मिळते.

 

शाओमी मी बँड मध्ये १.५६ अमोलेड डिस्प्ले दिले आहे. २.५ डी कर्व्ड डिस्प्लेचे रिझॉल्यूशन 152×486 पिक्सल आहे. स्क्रीनची डेनसिटी ३२६ पीपीआय आहे. शाओमीच्या म्हणण्यानुसार, नवीन बँड मध्ये आधीच्या बँड ५ च्या तुलनेत ५० टक्के मोठी स्क्रीन दिली आहे. तसेच ४५०नीट्स ब्राईटनेस वाढवल्यामुळे स्क्रीन आउटडोअर किंवा सूर्याच्या प्रकाशात व्यवस्थित दिसते.

मी बँड तुमच्या सहा ऍक्टिव्हिटी ऍटोमॅटिक ट्रॅक करू शकतो. स्लीप ब्रीदिंग क्वॉलिटी, REM (रॅपिड आय मुव्हमेंट) व नॅप टाइम संबंधी माहिती देते. याशिवाय, दुसऱ्या ट्रॅकिंग ऑप्शनसारखे जसे ब्रीद एक्सरसाइज, स्ट्रेस मॉनिटरिंग, फीमेल हेल्थ ट्रॅकिंग आणि PAI (पर्सनल एक्टिविटी इंटेलिजेंस) सुद्धा हे बँड सपोर्ट करतो. NFC वर्ज़न मल्टी-फंक्शन NFC सपोर्ट करतो. ज्यात एक टॅपवर पेमेंट केले जाऊ शकते. मी बँड ६ मध्ये Xioao AI असिस्टेंट बिल्ट-इन सपोर्ट मिळू शकतो. कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.० सपोर्ट मिळते. यात ३ ऍक्सेस एक्सीलेरोमीटर, ३ ऍक्सेस जायरोस्कोप सारखे आवश्यक सेन्सर आहेत . याशिवाय, मी स्मार्ट बँड ६ स्विम-प्रूफ 5ATM वॉटर-रेजिस्टेंट आहे, ज्यामध्ये ५० मीटर खोल पाण्यात पण आपला बँड सुरक्षित राहतो. मॅग्नेटिक चार्जिंग, 125mAh LiPo बॅटरी आणि १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ सारखे फीचर्सचा समावेश आहे. मी बँड 6 चे डाइमेँशन 47.4 x 18.6 x 12.7 मिलीमीटर आहे.

आता किंमतीचे पाहू, याची अंदाजित किंमत साधारपणे २५०० ते ३००० रुपयांदरम्यान असणार आहे.

Leave a Comment