सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनवाला यांना केंद्राकडून ‘Y’ कॅटेगिरीची सुरक्षा

 

नवी दिल्ली । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना सीआरपीएफच्या ‘Y’ श्रेणीचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांचा हवाला देऊन याबाबत माहिती दिली आहे. अदार पूनावाला यांना वाय श्रेणी संरक्षण देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. हे संरक्षण केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात सीआरपीएफद्वारे प्रदान केले जाईल, जे पूर्ण देशभर लागू होईल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) बुधवारी राज्यांना विकल्या जाणाऱ्या लसींच्या किंमती कमी केल्या. याअंतर्गत राज्यांना आता लससाठी पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 400 रुपये प्रति डोसऐवजी 300 रुपये प्रति डोस द्यावे लागेल. प्रारंभी सीरम संस्थेने ‘covishield’ला केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये दराने विकल्यानंतर कंपनीच्या किंमत धोरणांवर व्यापक टीका केल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदर्श पूनावाला यांनी ट्विटरवरून राज्यांसाठी लसीची किंमत कमी करण्याची घोषणा केली. त्यांनी लिहिले, ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून सेवाभावी दृष्टिकोन म्हणून राज्यांसाठी किंमत प्रति डोस 400 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत कमी केली जात आहे. यामुळे राज्यांची हजारो कोटी रुपयांची बचत होईल. हे अधिक लसीकरण सक्षम करेल आणि असंख्य जीव वाचवेल’.

You might also like