हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात दिवाळीपर्व सुरु आहे. आज याच दिवाळी सणाचा तिसरा दिवस आहे. म्हणजेच आज नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) आहे. हिंदू मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला लहान दिवाळी साजरी केली जाते. या दिवसाचे विशेष महत्त्व पोतीपुराणात लिहून ठेवण्यात आले आहे. नरक चतुर्दशीला रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी, नरक पूजन असे ही म्हणले जाते. आजच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून यमाच्या नावाने दीप प्रज्वलन केले जातात. ज्यामुळे मृत्यूची भीती नाहीशी होते. आज आपण याचं दिवसाची माहिती आणि दीप प्रज्वलन करण्याचा मुहूर्त जाणून घेणार आहोत.
नरक चतुर्दशी मुहूर्त
यंदा नरक चतुर्दशी आज म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर 2023 रोजी आली आहे. आज ही चतुर्दशी 01 वाजून 57 पासून सुरू होत आहे. तर ती 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02 वाजून 44 मिनिटांनी संपेल. आज हनुमान आणि यम देवतेची पूजा केली जाईल. तसेच आजची ही छोटी दिवाळी फटाके फोडून यमदीप प्रज्वलित करून साजरी करण्यात येईल.
यमदीप मुहूर्त
आजच्या दिवशी सायंकाळच्या वेळी स्नान करण्यात यावे. तसेच, संध्याकाळी 05 वाजून 32 मिनिटांपासून यमदीप लावण्यास सुरुवात करावी. आज सूर्यास्त सायंकाळी 05 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. यानंतर यम आणि हनुमान यांची मनोभावे पूजा करावी.
पौराणिक कथा
हिंदू पौराणिक कथा आपल्याला असे सांगते की, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुर राक्षसाचा वध केला होता. त्यावेळी त्यांनी सुमारे 16 हजार मुलींना मुक्त करून त्यांना नवे जीवदान दिले होते. त्यामुळे आजच्या दिवशी यमदीप लावण्यात येतात. ज्यामुळे मृत्यूची भीती नाहीशी होते.