Monday, February 6, 2023

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रा यांनी पोलिसांना 25 लाखांची लाच दिली; आरोपी यश ठाकूरचा दावा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणातील फरार आरोपीच्या दाव्याने आता पोलिस खात्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारी रात्री 11 वाजता राज कुंद्राला अटक करण्यात आली. यानंतर त्याला किल्ला कोर्टाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अश्लील चित्रपट प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी असा दावा केला आहे की पोलिसांनी यापूर्वी राज कुंद्राला अटक केली असती, परंतु हे टाळण्यासाठी त्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना 25 लाखांची लाच दिली आहे. पोलिसांनीही त्यांच्याकडून लाच मागितल्याचा दावा यश ठाकूर यांनी केला आहे.

यश ठाकूर ने दावा केला आहे की यासंदर्भात मार्च महिन्यात महाराष्ट्र एंटी करप्शन ब्युरोला ईमेल पाठवून त्यांनी याबाबत तक्रार केली होती. यशकुमार यांचा असा दावा आहे की, गुन्हे शाखेच्या अधिका्याने राज कुंद्राकडून 25 लाखांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एप्रिलमध्ये मुंबई पोलिस आयुक्तांना हा ईमेल पाठविला होता. अश्लील चित्रफीत प्रकरणात यश ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो फरार आहे, हे विशेष.

- Advertisement -

विशेष म्हणजे यश ठाकूर स्वतः पोर्न फिल्म प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे . शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. तो 23 जुलैपर्यंत किला कोर्ट पोलिसांच्या रडारावर आहे. अश्लीलतेशी संबंधित एका प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.