खळबळजनक ! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली आहे. प्रथम प्रेयसीने आणि त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि हत्या नेमकी कशामुळे केली हे अजून समजू शकले नाही. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत होता. यादरम्यान घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले.

मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने घरातील लोखंडी आडूस लावून स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा आकाश घरी परत आला तेव्हा सावित्रीने आत्महत्या केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगितले. हि महिला निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने ही घरातील लोखंडी आडूस लावून स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घटनास्थळाचा पंचनामा केला.

Leave a Comment