Monday, February 6, 2023

उद्योजक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद : एमआयडीसीत युनिट चालवणाऱ्या युवा उद्योजकाने 20 जुलै रोजी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव भाऊसाहेब मरकड, (वय 26), रा. आरएच 111/10 बजाजनगर असे मृताचे नाव आहे. वैभव रविवारी मुलगी बघायला जाणार होता. वैभवचा 5 जुलै रोजी वाढदिवस साजरा केल्यानंतर पंधरा दिवसातच वैभवने जगाचा निरोप घेतला.

वैभवचे वडील एका नामांकित कंपनीत कार्यरत आहेत, तर वैभवने छोटासा उद्योग सुरू केला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी आईची तब्येत बरी नसल्याने वडील व वैभव फराळाचे पदार्थ बनवले. व त्यानंतर वडील सेकंड शिप्टसाठी बसस्टॉपवर गेले व लहान भाऊ बाहेर गेला. आजारी आई हॉलमध्ये आराम करत होती.

- Advertisement -

दरम्यान, वैभवच्या मोबाईलवर बराच वेळ फोन येत होता. पण तो फोन घेत नसल्याने आईने वैभवला आवाज देण्यास सुरुवात केली पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आई स्वयंपाक घराच्या दिशेने गेली तेव्हा त्यांना वैभव गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहून आईला धक्काच बसला. आईने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी वैभवला खाली उतरून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.