या कारणामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना नागरिकांनी धक्काबुक्की करून लावले हाकलून..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

जिल्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील वलगाव येथे पुनवर्सन लोकवस्तीला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी घटनास्थळी गेलेल्या आमदार यशोमती ठाकूर यांना आगग्रस्त नागरिकांनी घटनास्थळा वरून धक्काबुक्की करून हाकलून लावले. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी वलगाव येथील पुनवर्सन लोकवस्तीला अचानक आग लागली. यावेळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर या दोन तासानंतर सदर ठिकाणी पोहचल्या. मात्र २००७ पासून ९० कुटुंबाचा पुनर्वसनाचा मुद्दा निकाली न लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना धक्काबुक्की करत हाकलून लावले.

आज ज्या ठिकाणी आग लागली त्याठिकाणच्या लोकांचे पुनर्वसन शासनाने केले नसून हा मुद्दा रेंगाळत चालला आहे त्यामुळे याला यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

Leave a Comment