अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तीन पक्षानी एकत्र येत राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन केले. एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि इतर सहा मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर 30 डिसेंबरला उर्वरित ३६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अनेक मंत्र्यांना अद्यापही मंत्रीपदाचं वाटप झाले नाही.
असं असताना कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लावल्याने यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण हे खाते मिळाले तर नाही ना? ही चर्चा सध्या रंगू लागली आहे.
आज यशोमती ठाकूर मंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांचं मूळ गाव असलेल्या मोझरी गुरुकुंज येथे आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. या बॅनरबाजीमध्ये कितपत तथ्य आहे हे आता लवकरच समजून येईल.