यशवंत बँकेचे योगदान ः सातारा, सांगली येथे ऑक्सीजन प्लांट उभारणीस २ कोटींचे अर्थसहाय्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मागील वर्षी कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केला आणि सर्व जनजीवन हेलावून टाकले. आजही हा विषाणू त्याचे रौद्रभीषण रूप दाखवत आहे. या काळात रुग्णांना जास्त गरज आहे ती म्हणजे ऑक्सीजनची. वेळेत ऑक्सिजन – व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आजही अनेक रुग्ण दगावत आहेत.
याचा विचार करून यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी व संचालक मंडळाने उद्योगक्षेत्रासाठी ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या सातारा येथील भारत डिस्ट्रिब्युटर व सांगली येथील टेक्नोएअर इक्विपमेंट्स या उद्योजकांना त्यांच्या प्लांटची क्षमता वाढवून हॉस्पिटलसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन पुरवठा करण्याचा आग्रह केला. यासाठी त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून वेळेत अर्थसहाय्य सुद्धा केले.

याचाच परिणाम म्हणून आज सातारा येथील व सांगली या दोन्ही ठिकाणी हे प्लांट नियमितपणे पूर्ण क्षमतेने ऑक्सीजन निर्मिती व वितरणाचे काम करीत आहे. याचा लाभ अतिदक्षता विभागातील रुग्णांना होत आहे. योग्यवेळी केलेले अर्थसहाय्य रुग्णांना नवसंजीवनी ठरत आहे. सातारा येथे दररोज ८०० लिटर तर सांगली येथे ४५० लिटर ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. या उद्योगांमुळे ५० तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. मेक इन इंडिया, स्टार्टअप तसेच आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणणेसाठी उद्योजकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने बँकेने हे पाऊल टाकले आहे. बँकेने आम्हास योग्य मार्गदर्शन व वेळेत अर्थपुरवठा केल्याने आज आम्हास ही सेवा देत येत आहे, याबद्दल या उद्योजकांनी तसेच संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने बँकेचे आभार मानले आहेत. बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी देखील संचालक मंडळाने दूरदृष्टीने केलेल्या या अर्थसहाय्याबद्दल बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांचे आभार मानले आहेत.

कोरोना रूग्णांना मदतीचा हात

कोविड काळात अनेक संक्रमित रुग्ण, त्यांचे नातेवाईक बँकेकडे हॉस्पिटलला भरती होणे. वाहनाची व्यवस्था, घरी जेवणाचा डबा, औषधे, लसीकरण नोंदणी यासाठी संपर्क साधत असतात. याकरिता मुकुंद चरेगांवकर तसेच वैशाली मोकाशी, श्रद्धा जोशी, सुजित पवार, रुपेश कुंभार हे अधिकारी उत्साहाने याकरिता त्यांना मदत करीत असतात.

Leave a Comment