सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या अनुषंगाने दरवर्षी भरणारी शिखर शिंगणापूरची यात्रा यावर्षी न भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. तरी सर्व भाविकांनी देवाची पूजा आर्चा ही घरातच बसून करावी. कोणीही मंदिरात येऊ नये व नियमांचे पालन करावे. मंदिराकडे येणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. उद्यापासून सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने चालू राहतील. यानंतर पाच वाजेपर्यंत घरपोच सेवा चालू राहील. कोणताही नागरिक रस्त्यावर येणार नाही. उद्यापासून सातार्यात विनाकारण बाहेर पडणा-यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सांगितले.
केवळ 25 लोक लग्नाला
लग्नाला केवळ 25 लोकांची परवानगी आहे. त्यामध्ये आचारी, ब्राम्हण, नवरा मुलगा, नवरी मुलगी तसेच तेथे उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती धरून ही परवानगी आहे. तसेच लग्नासांठी वेळेची मर्यादाही राहणार आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा