‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटला बसला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा; व्हिडीओ झाला वायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे सध्या अनेक जाळे धोक्यात आहे. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जोरदार फटका बसला आहे. या वादळामुळॆ अक्खी मुंबई पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. आज रात्री ८ ते ११ च्या दरम्यान हे चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार असल्याचे वृत्त मिळत आहे. यापूर्वी गुजरातच्या अनेक भागात वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही टीव्ही मालिकांनाही या वादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेच्या सेटवर तौक्ते चक्रीवादळाने अक्षरशः सर्वांची दाणादाण उडवली आहे. याचा व्हिडीओ करण कुंद्राने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान वायरल होतो आहे.

 

कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व प्रकारचे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. यामुळे अनेक टीव्ही शो व मालिकांचे सेट अन्य राज्यांत हलवण्यात आले आहेत. गुजरातच्या वापी शहरात सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे. मात्र तौक्ते वादळामुळे येथेही अनेक मालिकांच्या चित्रीकरणाची बोंब झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मालिकेच्या सेटचे प्रचंड नुकसान झाले. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटलाही वादळी वारा व मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेता करण कुंद्राने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत सेटवरच्या लोकांची होणारी पळापळ आपण पाहू शकतो. पळा पळा म्हणून अनेक क्रू मेंबर्स अक्षरशः सैर वैर पळत आहेत. काही जण सामान सुरक्षित जागी पोहोचवण्याचे काम करताना दिसत आहेत. सध्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अलीकडेच अभिनेता करण कुंद्राची एन्ट्री झाली आहे. तो या मालिकेत रणवीर नावाचे पात्र साकारत आहे. शिवांगी जोशी आणि मोहसीन खान या मालिकेत मुख्य भूमिकांममध्ये आहेत.

You might also like