…हा तर चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव ; काँग्रेसची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विशेष प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. “मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यभर मोर्चे काढणे, आंदोलन करणे आदींबाबतचा निर्णय घेणे हा तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील दावाच म्हणावा लागेल,” अशी घणाघाती टीका लाखे पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप करण्याचे काम राज्यातील भाजपकडून केले जात आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार काहीच करीत नसल्याचे सांगत असल्याने याविरोधात आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून भाजवर निशाणा साधला जात आहे. आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विशेष प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चंद्रकांत पाटील व भाजपकडून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या विरोधात कशा प्रकारे मोर्चा काढण्याची तयारी केली जात असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.

यावेळी डॉ. लाखे पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीकाही केली. मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा कावेबाज डाव आहे. तसेच आरक्षणाबाबत मगरीचे अश्रू चालण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. खर्च जर मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या घरासमोर मोर्चे काढून दाखवावेत. कारण आरक्षणाचा अधिकार केंद्र व संसदेचा असल्याचे डॉ. लाखे पाटील म्हणाले.

Leave a Comment