हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदर वाढत असतानाच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव जोडले गेले आहे.
आता खाजगी क्षेत्रातील Yes Bank कडून आपल्या अनिवासी बाह्य म्हणजेच NRE (Non-Resident External) डिपॉझिट्सच्या व्याजदरात बदल केला गेला आहे. मात्र हे बदल फक्त 2 कोटींपेक्षा कमीच्या NRE डिपॉझिट्सवर केले गेले आहेत. 3 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या बदलानंतर, आता येस बँकेकडून NRE डिपॉझिट्सवर जास्तीत जास्त 7.50% व्याजदर दिला जातो आहे.
Yes Bank च्या NRE डिपॉझिट्सचे नवीन दर
बँक आता एक वर्ष ते 18 महिन्यांच्या NRE डिपॉझिट्सवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे, तर येस बँक 18 महिने ते 24 महिन्यांच्या डिपॉझिट्सवर जास्तीत जास्त 7.5 टक्के व्याजदर देईल. 24 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीच्या NRE डिपॉझिट्सवरील व्याजदर 7.25% वर केला गेला आहे.
12 महिने पूर्ण होण्याआधीच जर FCNR, NRE आणि RFC FD मधून पैसे काढले गेले तर त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तरीही NRE आणि NRO FD ला ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल व्याजदरापासून दूर ठेवले जाते.
येस बँकेच्या NRE रिकरिंग डिपॉझिट्सचे नवीन दर
Yes Bank कडून रिकरिंग डिपॉझिट्सचे दरही अपडेट करण्यात आले आहेत. आता बँक 12 ते 15 महिन्यांच्या NRE RD वर 7.25 टक्के तर 18 ते 21 महिन्यांच्या NRE RD वर 7.50 टक्के तसेच आता 24 महिने ते 10 वर्षांच्या NRE RD वर 7.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, 12 महिने पूर्ण होण्यापूर्वी NRE RD काढल्यास त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. याचा कमीत कमी कालावधी 12 महिने आहे, त्यानंतर 3 महिन्यांच्या पटीत, जास्तीत जास्त कालावधी 10 वर्षांचा असेल. येस बँकेत कमीत कमी मासिक हप्ता 1,000 रुपयांचा असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Bank of Maharashtra कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये 0.20 टक्क्यांनी केली वाढ
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळेल 7 टक्क्यांहून जास्त व्याज, व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा