हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या YES Bank ने आता FD चे नियम आणखी कडक केले आहेत. आता बँकेच्या ग्राहकांना मुदती आधी FD काढण्यासाठी जास्त दंड भरावा लागणार आहे.
YES Bank च्या वेबसाइटनुसार, प्रत्येक मुदतीच्या FD साठी प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचे दर देखील वेगवेगळे आहेत. याबाबत आता दंडाच्या रकमेत बदल करण्यात आला आहे. हे नवीन नियम 8 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे. या अंतर्गत आता लॉक-इन कालावधीपूर्वी एफडी तोडल्यास गुंतवणूकदारांना दंड म्हणून जास्त रक्कम द्यावी लागेल. मात्र एफडीच्या कालावधीनुसार दंडाची रक्कम ठरवली जाईल.
कोणत्या FD वर किती दंड द्यावा लागेल
YES Bank च्या मते, 181 दिवसांपेक्षा कमी मुदतीच्या FD साठी आता मुदती आधी पैसे काढण्यासाठी दुप्पट दंड द्यावा लागेल. त्याचप्रमाणे, 182 दिवस किंवा त्याहून जास्त कालावधीची FD मुदती आधी खंडित केल्यास आता 0.75 टक्के दंड आकारला जाईल. मात्र हे नियम ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार नाहीत, असेही बँकेने म्हटले आहे.
बँक कर्मचाऱ्यांना मिळेल सवलत
बँकेच्या नियमांनुसार, FD वरील दंडाची ही व्यवस्था सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी आहे. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही बाबतीत सवलत देण्यात आली आहे. या अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी 5 जुलै 2019 ते 9 मे 2021 या कालावधीत FD मिळवकेली आहे, त्यांना मुदती आधी FD काढण्यासाठी नवीन सिस्टीमनुसार दंड भरावा लागेल. तसेच 10 मे 2021 नंतर FD काढल्यास कोणताही दंड लागू होणार नाही
ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत
YES Bank ने म्हटले आहे की, 5 जुलै 2019 ते 15 मे 2022 दरम्यानच्या FD वर, ज्येष्ठ नागरिकांना मुदतीआधी पैसे काढण्यासाठी नवीन सिस्टीमनुसार दंड भरावा लागेल. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांनी 15 मे 2022 नंतर एफडी केली आहे, त्यांना मुदतीआधी पैसे काढण्यासाठी दंड भरावा लागणार नाही. मात्र, FD मधून पूर्ण किंवा आंशिक पैसे काढण्यावरही प्री-मॅच्युअर दंड लागू होईल.
बँकेकडून FD चे व्याजदरही वाढवण्यात आले
YES Bank ने 18 जून रोजी आपल्या एफडीवरील व्याजदरातही वाढ केली होती. या अंतर्गत, आता सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवर बँकेकडून 3.25 टक्के ते 6.50 टक्के व्याज दिला जाईल, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज दिला जाईल. यामध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD चा समावेश आहे. याशिवाय, बँकेकडून 18 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीतील 2 कोटींपेक्षा कमी मुदतीच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7 ते 7.25 टक्के व्याज दिला जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!
Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा