नवी दिल्ली | दिलेले कर्ज वेळेत वसूल न करू शकल्यामुळे अनेक बँका डबघाईला आल्या. त्यामध्ये खासगी क्षेत्रातील येस बँक ही सुद्धा घाट्यात चालत होती. या बँकेला मोठ्या प्रमाणात कर्जाच्या रकमेमधून तोटा झाला होता. याच बँकेला चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये मोठा फायदा झाला आहे. बँकेला निव्वळ नफा हा दीडशे कोटीचा झाला आहे.
10 महिन्यांपूर्वी घट्यात असल्यामुळे आरबीआयने येस बँकेवर प्रतिबंध लावले होते. त्यानंतर बँकेचे बोर्ड सुद्धा भंग केले होते. मागील वित्तीय वर्षाच्या समान तिमाहीमध्ये कर्ज दिल्यामुळे बँकेला 18654 कोटी चा घाटा झाला. शेअर बाजाराला बँकेने दिलेल्या सूचनांनुसार बँकेची आय वाढवून 6518.37 कोटी झाली आहे. जी मागील तिमाहीत 6268.50 कोटी इतकी होती.
तीमाही मध्ये बँकेची नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच NPA कमी होऊन, पूर्ण कर्जाच्या 15.36 टक्के इतके राहिले होते. मागील वर्षाच्या तिमाहीमध्ये 18.87 इतके NPA होते. NPA कमी होऊन चालू वर्षाच्या तिमाहीमध्ये 4.4 इतके राहिले असून. गतवर्षीच्या वित्तीय वर्षाच्या तिमाहीमध्ये 5.97 टक्के होते.