हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank कडून त्यांच्या नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट (NRE) च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 50 ते 75 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. RBI ने इंक्रीमेंटल फंड फ्लोज मध्ये मदत करण्यासाठी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार बँकेकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. याआधी, RBI ने फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट (FCNR) च्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सनी वाढ केली होती.
आता Yes Bank ने 12 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या NRE FD चा दर 7.01 टक्के प्रतिवर्ष केला आहे. बँकेकडून एका निवेदनात सांगितले गेले की, हे सर्व सुधारित दर 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्ससाठी लागू आहेत. तसेच आता बँकेकडून 12 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या डॉलर FCNR डिपॉझिट्सवर वार्षिक 4.25 टक्के दर दिला जाणार आहे.
NRE FD बुक करण्यासाठी, ग्राहक Yes Bank चे डिजिटल बँकिंग चॅनेल जसे की, येस ऑनलाइन (नेट बँकिंग), येस मोबाइल (मोबाइल बँकिंग) किंवा येस रोबोट (पर्सनल बँकिंग चॅटबॉट) ला भेट देऊ शकतात किंवा Yes Bank च्या जवळच्या शाखेत जाऊ शकतात किंवा मेसेज करू gib@yesbank वर शकता.
अलीकडेच RBI ने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला
अलीकडेच RBI कडून रेपोदरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के करण्यात आला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे.
बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सच्या दरात वाढ
अलीकडेच एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक,पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक इत्यादी बँकांनी देखील आपल्या एफडीवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीं दर वाढवण्यास सुरूवात केली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/nri-banking/nri-deposits/fixed-deposits/nre-fixed-deposits
हे पण वाचा :
Business Idea : केळीच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे करा भरपूर कमाई !!!
Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर