हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank कडून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली गेली आहे. बँकेच्या वेबसाइटवरील माहिती नुसार,नवीन MCLR याआधीच लागू करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI ने रेपो रेट 4.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ज्यानंतर जवळपास एक महिन्यानी बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
1 जुलैपासून नवीन MCLR लागू झाला आहे. यामुळे आता बँकेच्या नवीन आणि सध्याच्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर वाढेल. यामध्ये होम लोन, कार लोन, पर्सनल लोन सहित इतर सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. RBI ने रेपो दरात केलेल्या वाढीचा हा थेट परिणाम आहे. हे लक्षात घ्या कि, रेपो दरातील कोणताही बदलाचा MCLR वर परिणाम होतो. Yes Bank
बँकेचे नवीन व्याजदर
बँकेच्या ओव्हरनाइट लोनचा MCLR 7.60 टक्के, एका महिन्यासाठी 8.25 टक्के, सहा महिन्यांसाठी 8.70 टक्के आणि एका वर्षासाठी 8.95 टक्के आहे. 1 जूनपासून येस बँकेचा मूळ दर 8.75 टक्के आहे. त्याच वेळी, 26 जुलै 2011 पासून Yes Bank चा BPRL रेट 19.75 टक्के करण्यात आला आहे.
बाह्य बेंचमार्कवर आधारित व्याज दर
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, MSME, रिटेल किंवा पर्सनल फ्लोटिंग रेट लोन बाह्य बेंचमार्कवर आधारित असावीत. येस बँकेने कर्जाच्या व्याजदराचा संदर्भ म्हणून रेपो दराचा विचार सुरू केला आहे. बँकेने 1 एप्रिल 2022 पासून नवीन सिस्टीम स्वीकारली. त्यापूर्वी तिचा बेंचमार्क 6 महिन्यांचासर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट होता.
MCLR म्हणजे काय ???
मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) हा एक बेंचमार्क व्याज दर आहे, जो बँकांना त्यांच्या ग्राहकांना कर्ज देण्याची परवानगी असलेला किमान व्याज दर आहे. हे कर्जासाठी व्याजदराची कमी मर्यादा सेट करते. MCLR मध्ये वाढ झाल्याने Yes Bank चे होम लोन आणि इतर लोनचे व्याज वाढण्याची शक्यता आहे.
RBI कडून दोन वेळा रेपो रेट वाढवण्यात आला
हे लक्षात घ्या कि, RBI ने मे आणि जूनमध्ये दोनदा रेपो दरात वाढ केली. ज्यामुळे RBI चा पॉलिसी रेट आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. RBI कडून इतर बँकांना रेपो दराने लोन दिले जाते. हे जाणून घ्या कि, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI कडून रेपो दर वाढवण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/money-matters/personal-loan-interest-rates-charges-fees-in-india
हे पण वाचा :
Gold Price : गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ